नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा ही भारतीय संस्कृतीची महानता आहे, असे प्रतिपादन सुनीता गायधनी यांनी केले. लेखक विश्वास साक्रीकर यांच्या शोध कुंभपर्वाचा या पुस्तकावर सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तक मित्रमंडळातर्फे आयोजित पुस्तक व्याख्यानप्रसंगी गायधनी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते.
सुनीता गायधनी यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीबद्दल आस्था निर्माण करणे हा हेतू स्पष्ट केला. पंच महाभूतांचा परिणाम आपल्या देह कुंभावर कसा पडतो याचे स्पष्टीकरण केले. जगात आपल्या संस्कृतीसारखी दुसरी संस्कृती नाही, असा आपण अभिमान बाळगला पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

पुस्तक मित्रमंडळ प्रमुख मंगेश मालपाठक यांनी प्रास्ताविक केले. वाचनालयाचे पदाधिकारी देवदत्त जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. माधुरी देशपांडे लिखित देवीवरील पुस्तकाचे प्रकाशन झाले. समिती सदस्य सुहास टिपरे यांनी सूत्रसंचालन केले. इंदिरानगर शाखेचे अविनाश बल्लाळ, सुभाष सबनीस, सुहास गायधनी, मधुरा फाटक यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. ग्रंथपाल पौर्णिमा आंबेकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
—
—