नाशिक : प्रतिनिधी
शिंदे (नाशिक) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनी क्षितिजा शशिकांत जाधव ही एनएमएमएस ही स्कॉलरशिप परीक्षा पात्र झाली. ती इयत्ता आठवी क ची विद्यार्थीनी आहे.
या यशाबद्दल तिचे प्राचार्या श्रीमती वाळेकर, पर्यवेक्षक श्री. देसाई व विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. क्षितिजा हिला वाळेकर मॅडम, गावित मॅडम, पाटील मॅडम व देवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
—