नाशिक : प्रतिनिधी
क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आयटीआयच्या प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांनी ढकांबे गावातील माध्यमिक विद्यालयाचा परिसर व प्रांगणाची स्वच्छता केली. राज्याचे कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा व संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय यांच्या आदेशानुसार स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान झाले. शनिवार (दि 20 सप्टेंबर) ढकांबे (ता. दिंडोरी) येथे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय प्रांगण, मारुती मंदिर आवार व परिसराची स्वच्छता केली.
केव्हीएन नाईक आयटीआयमधील प्रशिक्षणार्थी, तसेच आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे, गटनिदेशक साहेबराव हेंबाडे, उमेश पालवे, निदेशक दीपक साळवे, आनंद जाधव, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, प्रतीक्षा बदादे, सोनाली खिराडी, मोहन पवार, अजय पवार, योगेश गांगोडे, संदीप काजळे, भारती नागरे यांनी आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सहभाग घेतला.
या स्वच्छता अभियानामध्ये संस्थेचे संचालक शरद बोडके, सुभाष आव्हाड आणि बाळासाहेब धात्रक, तसेच माध्यमिक विद्यामंदिर ढकांबेचे मुख्याध्यापक ताडगे, तसेच ग्रामस्थ, भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हा दक्षिण ग्रामीण चिटणीस लक्ष्मण गायकवाड, ज्ञानेश्वर बोडके, दत्तू बोडके यांनीसुद्धा या स्वच्छता अभियानामध्ये स्वच्छता केली. तसेच प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेच्या संचालकांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
—