नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोड येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शुक्रवारी (दि. १२ डिसेंबर) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम झाले.
लोकनेते मुंडे यांच्या प्रतिमेस आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांनी पुष्पांजली अर्पण केली. त्यांनी प्रास्ताविकात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा आणि समाजकारणातील योगदानाचा उल्लेख करून प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रशिक्षणार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षित वैद्यकीय समता ब्लड बँकेच्या पथकाच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर झाले. अनेकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.
प्राचार्य काळे, गटनदेशक साहेबराव हेंबाडे, उमेश पालवे, तसेच निदेशक दीपक साळवे, आनंद जाधव, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, अजय पवार, योगेश गांगोडे, भारती नागरे, अमोल नागरे, राहुल सानप, सोनाली खिलाडी आदी कर्मचारी यांचे या कार्यक्रमास योगदान लाभले.
—