नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोड येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये खंडे नवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. एक ऑक्टोबर) आयुध पूजन झाले.
संस्थेचे संचालक शरद बोडके आणि रेखाताई कातकडे, आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांनी आपापल्या वर्कशॉपची रंगरंगोटीसह स्वच्छता केली. यंत्रे व हत्यारे यांचे पूजन केले. विद्यार्थिनींनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळी काढून सगळ्यांचे लक्ष वेधले होते.
विश्वकर्मा, सरस्वती व क्रांतिवीर व्ही. एन. नाईक यांच्या प्रतिमांसह यंत्रे व हत्यारे यांचे पूजन करण्यात आले. आरतीमध्ये आयटीआयचे कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला. शरद बोडके व रेखाताई कातकडे यांनी आयुध पुजनाच्या शुभेच्छा दिल्या.
आयटीआयचे गटनिदेशक साहेबराव हेंबाडे, उमेश पालवे, निदेशक माणिक काकड, दीपक साळवे, आनंद जाधव, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, अमोल नागरे, अजय पवार, योगेश गांगोडे, मोहन पवार, प्रतीक्षा बदादे, सोनाली खिराडी, भारती नागरे, राहुल सानप, संदीप काजळे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
—