नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील विडी कामगारनगरमधील खंडाेबा महाराज देवस्थान येथे गुरुवारी (दि.९) चंपाषष्ठी यात्राेत्सव हाेणार आहे. यानिमित्त सकाळी सात वाजता रामकुंड येथून कावड यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त शशिकांत राऊत यांनी दिली.
या कावड यात्रेत संजय लाेंढे, दत्तात्रय साेनवणे, सुनील लहामगे, गाेरखनाथ साळवे, साेमनाथ भडांगे सहभागी हाेणार आहे. कावड यात्रेची विडी कामगार नगरातून मिरवणूक काढण्यात येईल. सकाळी आठ वाजता अभिषेक व आरती हाेणार आहे. सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन व आरती हाेईल. रात्री १० वाजता शाहीर रवींद्र चव्हाण व सहकारी यांचा जागरण व गाेंधळाचा कार्यक्रम हाेणार आहे. सर्व कार्यक्रम काेविडचे नियम पाळून हाेतील. चंपाषष्ठी यात्राेत्सव यशस्वी हाेण्यासाठी नवनाथ शिंदे, किशोर राजगुरु, याेगेश सांगळे, कल्पेेश वाघ, अथर्व राऊत आदी परिश्रम घेत आहेत.
—