नाशिक : प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ्य साहित्यिक प्रा. प्र. द. कुलकर्णी यांना काव्यरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने हा पुरस्कार दिला आहे. काव्यरत्न पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर, उपाध्यक्ष बाळासाहेब पलटणे व सचिव ॲड. रतनकुमार इचम यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. २२ फेब्रुवारीला होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. कुलकर्णी यांचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
हे मंडळ गेली २६ वर्षे ग्रामीण भागात मराठी साहित्य चळवळीचे कार्य सक्रियपणे करीत आहे. ग्रामीण भागातल्या नव्या लेखकांना प्रेरणा देत आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रोत्साहनाने सुरु झालेले हे मंडळ दर वर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करून त्या संमेलनात साहित्यिकांना पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
—
ज्येष्ठ्य साहित्यिक प्रा. प्र. द. कुलकर्णी यांना काव्यरत्न पुरस्कार जाहीर
Get real time updates directly on you device, subscribe now.