नाशिक : प्रतिनिधी
ओझर शहर माजी सैनिक, सिद्धिविनायक सहकारी औद्योगिक वसाहत व सिद्धिविनायक आयटीआय ओझर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सिद्धिविनायक सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन प्रभाकर पंत आढाव होते. प्रमुख पाहुणे म्हणून ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर केदार उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन अरविंद कदम, सेक्रेटरी प्रशांत शेळके, संचालक दिलीप मंडलिक, माजी सैनिक श्रीराम आढाव, लटूर सिंह वर्मा, पी. एम. सैनी, शिवराज पाटील, किशोर कोतकर, संजीव पाटील, बबनराव भरविरकर, हरिभाऊ शिंदे उपस्थित होते.
संस्थेचे व्यवस्थापक अनिल विचाळ यांनी स्वागत केले. संजय पवार यांनी अनुमोदन दिले. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व पूजा करण्यात आली. कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवर व उपस्थित सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लटूर सिंह वर्मा, पी. एम. सैनी, ओमप्रकाश चौरे, नवीन कुमार सिंह व एस. के. मोहंती यांनी कारगिल युद्धाबद्दल माहिती दिली. पोलिस निरिक्षक समीर केदार व प्रशांत शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल विचाळ व प्राचार्य बाळकृष्ण शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. माजी सैनिक श्रीराम आढाव यांनी आभार मानले.
यावेळी माजी सैनिक पंकज भावसार, मधुकर मोरे, अरुण ठुबे, अशोक पानसरे, गणपत धट, दिलीप निकम, दिनेश्वर प्रसाद, दिलीप कुमार नाथ, अशोक मोरे, रंगराव पाटील, संदीप शेटे, हरिभाऊ गुंजाळ, संजीव करमाकर, अवधेश कुमार, बी. डी. शर्मा, अजब नारायण सिंह, सरोज कुमार मोहंती, प्रभाकर जाधव, सनातन खिल्लर, सुरेश चौधरी, विरेंद्र कुमार त्रिपाठी, बी. एम. तिवारी, ए. के. सिंह, केशव पवार, के. टी. वाघ, संचित कातकाडे, अनिल भागवत, प्रविण अहिरे, नितीन मावळे, एम. के. चतुर्वेदी, बी. ओ. गुरव, ए. एन. सिंह, एम. के. वाघ, एस. एल. परिदा, आलोक कुमार मिश्रा, एस. के. पटनायक, रमेश खरात, सचिन कुमार, अमित कुमार, सत्येंद्र कुमार सिंह, संदीप नगरकर , नगर परिषदेचे प्रतिनिधी संतोष सोनवणे, सागर राऊत, तसेच सचिन आढाव, बाळासाहेब घोलप, उत्तम गारे, गणेश घोलप, संस्थेचे संचालक मंडळ, उद्योजक, आयटीआयचे कर्मचारी विद्यार्थी व माजी सैनिक परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सैनिक श्रीराम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल विचाळ, बाळकृष्ण शिरसाट, संजय पवार, देवेंद्र कुंवर, रत्नमाला तडाखे (मोरे), किरण पगार, अविनाश कमानकर, महेंद्र पगारे, सतिश भुजाडे, शशिकांत मंडलिक, रविंद्र जाधव यांनी परिश्रम घेतले.
—
ओझर येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा
Get real time updates directly on you device, subscribe now.