
नाशिक : प्रतिनिधी म्हसरूळ येथील कलानगरमधील छत्रपती संभाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे शिवजन्मोत्सव सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे हार्दिक निगळ, शुभम पाटील, अर्जुन घोटेकर, प्रसाद गोसावी, शुभम दाणी, सिद्धांत तिसगे, साहील गांगुर्डे, विशाल सोनवणे, गौरव डव्हाण, साहील उनवने, शुभम निकम, आदीत्य सांगळे, ओमकार ईचाळे, कृष्णा मुसळे, कृष्णा पटेल, ईशान बागुल आदी उपस्थित होते. लक्ष्मीकांत पेलमहाले यांनी आभार मानले.
—