नाशिक : प्रतिनिधी
लहान वयात श्यामची आई सारखे पुस्तक संस्कार घडविण्यात मोलाचा वाटा उचलते. थोर लोकांच्या चरित्रांचे वाचन करणे म्हणजे स्वतःला प्रेरणा निर्माण करण्यासाठी मिळालेली संजीवनी होय, असे प्रतिपादन साहित्यिक सुहास टिपरे यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सध्या साजरा होत आहे. यातंर्गत गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या पुस्तकावर बोलू काही या उपक्रमातंर्गत वाचन का करावे व पुस्तक वाचनाचे महत्व यावर टिपरे बोलत होते. किड्स सोसायटी अंतर्गत मदर तेरेसा स्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यपिका संगिता बाविस्कर होत्या. शाळा संचालक गोपीनाथ रोडे यांनी याप्रसंगी मोलाचे योगदान दिले. टिपरे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले.
—