इनरव्हील क्लब ऑफ नाशिक मिडटाउनच्याअध्यक्षपदी चैताली शिंदे, तर सचिवपदी छाया पाटील

0

नाशिक : प्रतिनिधी
महिलांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रवृत्त करुन व स्वावलंबी बनवून कुटुंबासाठी अर्थार्जन करण्यासाठी आगामी वर्षात आपण व नूतन कार्यकारिणी इनरव्हील क्लब ऑफ नाशिक मिडटाउनमार्फत प्रयत्न करु, असे प्रतिपादन या क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा चैताली शिंदे यांनी प्रतिपादन केले.

यांनी केले पदग्रहण                                                      वर्ष २०२२-२३ च्या कार्यकालावधीच्या पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष – स्मिता केळूस्कर, सेक्रेटेरी – छाया पाटील, जॉईंट सेक्रेटेरी – प्रतिभा गोवर्धने, ट्रेझंरर – सुनीता उबाळे, आईएसओ सरोज जाजू, सीसी – प्रतिभा चौधरी यांनी पदग्रहण केले
काॅलर प्रदान
मावळत्या अध्यक्ष शीतल भावसार यांनी मागील वर्षात केलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल सादर केला व नूतन अध्यक्ष चैताली शिंदे यांना कॉलर प्रदान करुन पदभार सोपवला.
समाजसेविका व मिसेस युनिव्हर्स दुबई यांची उपस्थिती
समाजसेविका डॉ. सुनीताताई मोडक व मिसेस युनिव्हर्स दुबई २०२१ – संगीता खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा झाला. यावेळी डॉ. मोडक यांनी, महीलांनी स्वतःमधील अंगीभूत गुणांना ओळखावे  व इनरव्हीलच्या माध्यमातून महिलांसाठी व समाजासाठी उपयोगी प्रकल्पांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
           मिसेस युनिव्हर्स संगीता खैरनार यांनी त्यांच्या मीतभाषी संगीत ते ग्लोबल सेलेब्रिटी संगीत असा जीवन प्रवास उलगडून समाजात सन्मान प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, असे नमुद केले.
नवीन सदस्यांचा प्रवेश
                 पदग्रहण समारंभात नवीन ५ सदस्यांनी इनरव्हील क्लब ऑफ नाशिक मिड्टाउनमध्ये प्रवेश घेतला. सीसीसीसी – सरिता नारंग, क्लब ट्रेनर – डॉ. मनीषा जगताप, डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर – डॉ. उर्वशी निकम, तसेच एक्झिक्युटीव्ह टीम मेंबर – सोनिया वोहरा , माया जाधव, राजश्री हजारी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला.
             पीडीसी प्रेरणा बेळे व नाशिकमधील विविध इनरव्हील क्लब्जच्या पदाधिकारी व सदस्य आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउनचे भूतपूर्व अध्यक्ष दिलीप चव्हाण यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.
          इनरव्हील क्लबच्या सदस्य ॲड. चारुशीला खैरनार, विधि भगत, मीनल जयस्वाल, कीर्ति रहातेकर, स्मिता जाधव, रुचिता बाबेरवाल, माधुरी बोंडे, शीतल भामरे, नम्रता मराठे याप्रसंगी उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय ॲड. चारुशीला ख़ैरनार व डॉ. उर्वशी निकम यांनी करून दिला. कार्यक्रमाचें बहारदार सूत्रसंचालन प्रतिभा गोवर्धने व राजश्री हजारी यांनी केले. स्मिता केळूस्कर यांनी आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.