नाशिक : प्रतिनिधी
येथील श्रीमती पुष्पावती चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत कार्यरत अभिलाषा निसर्ग व योगोपचार केंद्रातर्फे स्वातंत्र्यदिनी भाभानगरमधील केंद्रावर ध्वजारोहण करण्यात आले. प्रा. पी. डी. कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

डीवायएसपी विजय सोनवणे आणि हेमचंद्र भसे व डॉ. तस्मिना शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. तस्मीना शेख यांनी राष्ट्रीय दिवसाचे महत्व समजावून सांगितले. संचालक मंडळाचे रणजित पाटील, ट्रस्टच्या सचिव सुनिता पाटील, सदस्य ऐनुद्दीन शेख, कमिटी सदस्य विजय सोनवणे, वंदना सोनवणे, हेमचंद्र भसे, महेश सोनवणे, सुशीला पवार, संगीता मोरे, निलोफर, पठाण, नीलिमा निमजे, काशेफा शेख, तसेच कॉलनीतील नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठ्य नागरीक व बालगोपाळांचा उत्साह अवर्णनीय होता.
—
—