नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ – वरवंडीरोडवर असलेल्या महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्याकडून बी.फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतावाढीबाबत मंजुरी मिळाली आहे. महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेत नुकतीच वाढ करण्यात आली आहे. महाविद्यालयाची नवीन प्रवेश क्षमता ६० हुन आता १०० झाली आहे.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने नमूद केलेल्या मानकानुसार सर्व प्रकारच्या सोयीसुविधा, पात्र शिक्षक, आवश्यक प्रयोगशाळा महाविद्यालयात उपलब्ध असल्याने सदर वाढ महाविद्यालयास देण्यात आली आहे. श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीश संघवी, कार्यकारी विश्वस्थ राहुल संघवी, सोसायटीच्या समन्वयिका, तसेच डीन डॉ. प्रियंका झंवर यांनी प्रवेश क्षमतावाढीसाठी समाधान व्यक्त केले आहे. सध्याच्या काळात जगभरात औषधांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सर्व फार्मसी क्षेत्रातील कंपन्यात कर्मचाऱ्यांची प्रचंड मागणी आहे. विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता सदर प्रवेश क्षमता वाढविण्यात आली आहे, असे मत महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अनिल जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.
—
महावीर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्रवेश क्षमतेत वाढ
बी. फार्मसीच्या जागा आता ६० हुन १००
Get real time updates directly on you device, subscribe now.
Next Post