नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये विद्यार्थ्यांना आपलं शहर याबद्दल शिकवण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वतःचे शहर, नकाशावरील त्याचे स्थान, त्यांना भेट देण्यास आनंद देणारी ठिकाणे, रेल्वेस्थानक, संग्रहालय आणि रुग्णालय यासारखी सार्वजनिक ठिकाणे विद्यार्थ्यांना अनुभवता आली. त्यामुळे त्यांना शहराबद्दल अधिक जाणून घेण्यास आणि आपलेपणाची भावना विकसित करण्यास मदत करता आली.
शिक्षकांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे त्यांना धार्मिक स्थळे आणि त्यांचे महत्त्व, औद्योगिक क्षेत्र, संरक्षण प्रशिक्षण केंद्र आदी समजावून सांगितले आणि दाखवले.
युडब्ल्यूसीईसीमध्ये हा उपक्रम घेण्यामागे हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना आपण राहतो त्या ठिकाणाबरोबर तिथे असलेल्या विविध ठिकाणाची माहिती कळते व यातून कुतूहल आणि चिकित्सेची सवय लागते.
—