नाशिक : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिंडाेरी राेडवरील म्हसरूळ येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळील ओम गुरुदेव हाॅल येथे रविवारी (दि.5जून) माेफत आराेग्य शिबिर हाेणार आहे.
सत्यशाेधक प्रतिष्ठानच्यावतीने हाेणाऱ्या या आराेग्य शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, इसीजी, आहार व व्यायाम, नेत्रतपासणी, इतर सर्व आजारांवरील तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे.
या शिबिरात डाॅ. अतुल अहिरराव, डाॅ. प्रमाेद खैरनार, डाॅ. आशिष जाधव तपासणी करणार आहे. शिबिर यशस्वी हाेण्यासाठी दीपक मंडलिक, शिवदास तिडके, वंदना बागूल, राजश्री गायकवाड, विकास मगरे, विजय आसाेलकर, राजेंद्र बागुल, बी. बी. पाटील, प्रदीप आहिरे, भरत राजकुळे, विनायक खाेडे प्रयत्नशील आहेत.
—