नाशिक : प्रतिनिधी
ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श शिक्षक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे विशेष शिक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी उद्योगपती राजेश उपासनी, जयश्री उपासनी, क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, सेवानिवृत्त शिक्षिका कल्पना भामरे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, लौकिक मांजरेकर, डॉ. सचिन हिरे, संस्थेचे सल्लागार अजित कुलकर्णी व ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड उपस्थित होते.
राजाराम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अनिल भंडारे व चारुशीला लवाटे यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. पुरस्कारार्थी अशोक शिरुडे, मिलिंद टिळे, जयंत येवला यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. वसुधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सचिव प्रदीप जगताप यांनी आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते संदीप पवार, संजय परदेशी, संगीता जाधव, अर्चना बोकेफोडे, ओमकार डावरे, किशोर शिरसाट व समाधान मोरे आदी प्रयत्नशील होते.
सत्कारार्थी शिक्षक असे :
रावसाहेब कांबळे, जीवनकुमार गोरे, भारती वराडे, संजय पाटील, दादासाहेब पाटील, अर्चना कोठावदे, स्नेहल अभ्यंकर, तन्वी महाडळकर, कांचन इप्पर, राजेंद्र खलोकर, निर्झरा रामटेके, अनिल महल्ले, आशा आर्य, सविता खांदवे, स्मिता गजभिये, मनीषा बाहुले, संध्या थोरात, कमलाकर सोनवणे, राहुल गवळी, अनिता पाटील, नेहा बोडखे, वसंत विसपुते, दत्तात्रय महाले, सुनंदा साळुंके, नितीन पवार, भारती चौधरी, सुरेश गोरे, सुनंदा नागरे, हिरामण शिंदे, अशोक शिरुडे, हेमंत पाटील, जयराम ससाणे, संदीप निकम, प्रशांत पाटील, जयंत येवला, रजनी घाणे, मिलिंद टिळे, कैलास देसले, संध्या कुलकर्णी, ईश्वर चौरे, ताराचंद मेतकर, डॉ. सचिन हिरे, योगेश कुलकर्णी.
—