गुरु गोबिंदसिंग अभियांत्रिकीतील प्रा. संदीप पाटील यांना पीएच.डी.

0

नाशिक : प्रतिनिधी
गुरुगोबिंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. संदीप सुभाषराव पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांचे संशोधन गाईंची वाहतूक करणाऱ्या वाहनातील बदलासंदर्भात आहे. हे संशोधन डॉ. जे. एच. भांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. या प्रकल्पास भारत सरकारचे संशोधन अनुदान प्राप्त झाले आहे. या संशोधनातून तीन पेटंट्स, तसेच अनेक संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख बलबीरसिंग छाब्रा, प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम, व्यवस्थापक, शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.