नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने आयोजित शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन शासनाचे मुद्रणलेखन सामग्री विभागाचे संचालक आर. डी. मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर, सार्वजनिक वाचनालय नाशिकचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, आयटीआय नाशिकचे उपप्राचार्य मोहन तेलंगी, आयोजक व शासकीय पुस्तक डेपोचे संचालक राजेश बंग आदी मान्यवर उपस्थित होते.
सावानाच्या फ्रेनीबाई दस्तूर सभागृहात आयोजित प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित आणि शासनातर्फे प्रकाशित हे पुस्तक केवळ १५० रुपयांमध्ये उपलब्ध झाले असून उद्घाटनाच्या वेळीच २०० प्रती वाचकांनी विकत घेतल्या. अशोक गाडेकर यांनी शासनाच्या मोफत ग्रंथाल कपाट योजनेविषयी सविस्तर माहित देताना सांगितले की, शासन प्रकाशनातील २५ हजार रुपये किमतीची पुस्तके खरेदी करणाऱ्यांना मोफत पुस्तक कपाट देण्यात येते. हे प्रदर्शन पुढील दोन महिने म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
—