नाशिक : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी चांगली सवय आणि शिस्तीचे अवलंबन केल्यास करिअरमध्ये यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक आशिष चांडक यांनी केले. अशोका एज्युकेशन्स फाऊंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस अँड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी महाविद्यालयात ‘उडान – सीझन ५’ या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी स्पर्धेचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन केल्याबद्द्ल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी स्पर्धेंसाठीचे प्रायोजक व्हर्सटाइल ओव्हरसीजच्या सीईओ रश्मी मतलानी यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवा आणि विविध कौश्यल्यातून ज्ञान आत्मसात करा असा सल्ला दिला. तसेच प्रायोजक तरुण ढिल्लन, जनरल मॅनेजर फिझीफॉक्स, नाशिक आणि सोहिल शाह, संचालक, करिअर लाँचर नाशिक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेचा हेतू हा विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करणे हा होता. ‘उडान – सीझन ५’ मध्ये वेबो-सॉफ्ट (सॉफ्टवेअर प्रकल्प आणि वेबसाइट डेव्हलपमेंट स्पर्धा), विंनिंग शॉट (पेनल्टी शूट आऊट), फिल्मेनिया (रिल्स मेकिंग), तत्वबोध (वादविवाद स्पर्धा), बिझ बी (बिझनेस प्लॅन), कोड शेफ (ब्लाइंड कोडिंग), माईम (अक्टिंग स्पर्धा) आणि मेलिस्मा (गायन स्पर्धा) या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेंसाठी नाशिक शहरातील विविध महाविद्यालयातील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
वेबो-सॉफ्ट स्पर्धेंसाठी इएसडिएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स लि., नाशिक सीनियर आर्किटेक्ट भगवान सहाणे आणि मनोज माळी यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेंमध्ये किशोर भागवत (एनव्हीपी महाविद्यालय, लासलगाव) हा विजेता ठरला तर मृण्मयी बागुल आणि पार्थ साळवे (पी व्ही जी इंजिनिअरिंग महाविद्यालय) हे उपविजेते ठरले. स्पर्धेचे समन्वयन श्रीमती कोमल कदम आणि श्रीमती रेखा शेकोकर यांनी केले.
विंनिंग शॉट (पेनल्टी शूट आऊट) स्पर्धेंमध्ये प्रथम स्थान केटीएचएम महाविद्यालय तर द्वितीय स्थान बीवायके महाविद्यालयाने पटकावले. स्पर्धेचे समन्वयन अंकित काळे यांनी केले.
फिल्मेनिया (रिल्स मेकिंग) स्पर्धेंसाठी रामशेज फिल्म प्रोडक्शनचे संस्थापक विजय जाधव यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेंमध्ये देव गोसावी (सीएमसीएस महाविद्यालय) हा विजेता ठरला तर भावेश जगताप (बिटको महाविद्यालय) हा उपविजेता ठरला. स्पर्धेचे समन्वयन सुजाता कातकाडे आणि समाधान निकम यांनी केले.
तत्वबोध (वादविवाद स्पर्धा) स्पर्धेंसाठी विधीज्ञनी आयपीआर कन्सल्टंट्सचे संस्थापक ॲड. दीपा कोचर यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेंमध्ये तनुश्री अडांगळे (भोसला मिलिटरी स्कूल) ही विजेती ठरली तर धडकन भाटिया (अशोका ज्युनियर महाविद्यालय) हि उपविजेती ठरली. स्पर्धेचे समन्वयन डॉ. रश्मी बोंबले आणि साक्षी वाणी यांनी केले.
स्पर्धेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी बिझ बी (बिझनेस प्लॅन), कोड शेफ (ब्लाइंड कोडिंग), माईम (अक्टिंग स्पर्धा) आणि मेलिस्मा (गायन स्पर्धा) या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बिझ बी (बिझनेस प्लॅन) स्पर्धेंसाठी उद्योजक आणि दंडे गोल्ड अँड डायमंड्सचे संचालक योगेश्वर दंडे आणि कुंभथॉन इनोव्हेशन फाउंडेशन चे संचालक गिरीश पगारे यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेंमध्ये वैष्णवी गांगुर्डे, अनुजा ठाकरे, सार्थक सोनवणे (एम.व्ही.पी. चे के.बी.टी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग) हे विजेते तर जयेश पाटील, अश्विन कुलकर्णी (संदिप विद्यापीठ, नाशिक) हे उपविजेता ठरले. यामध्ये हायड्रा वॉटर चेकर (एमव्हीपीचे केबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक), स्वच्छ कचरा व्यवस्थापन मशीन (संदीप विद्यापीठ), फर्णा व्हेंडिंग मशीन (एमईटी भुजबळ नॉलेज सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नाशिक) आणि सायबर सेफ डिव्हाइस, पब्लिक वायफाय सेफ डिव्हाइस (के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक) या चार बिझनेस कल्पनांची कुंभथॉन इनोव्हेशन फाउंडेशन च्या वतीने निवड करण्यात आली. स्पर्धेचे समन्वयन जयश्री पालीवाल आणि रेवथी नायर यांनी केले.
कोड शेफ (ब्लाइंड कोडिंग) स्पर्धेंसाठी नेटविनचे सॉफ्टवेअर डेव्हलपर धवल कंसारा यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेंमध्ये शुभम सिंग (आर.एच.सपट महाविद्यालय) हा विजेता ठरला तर आर्यन निंबाळकर (के.के. वाघ आर्टस्, कॉमर्स, सायन्स अँड कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालय) हा उपविजेता ठरला. स्पर्धेचे समन्वयन वृषाली वाबळे आणि दिपिता धांडे यांनी केले.
माईम (मुकनाट्य) स्पर्धेंसाठी नृत्यदिग्दर्शक कल्याणी डावरे यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेंमध्ये मयुरी सुतार आणि तिचा संघ (भोंसला मिलिटरी कॉलेज) विजेता ठरला. स्पर्धेचे समन्वयन सपना भुसारे, भक्ती भूसे आणि सेजल मालपाणी यांनी केले.
मेलिस्मा (गायन) स्पर्धेंसाठी प्रियंका कोठावदे आणि यामिनी कुलकर्णी यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेंमध्ये हेरंब कोळसकर (एच.ए.एल प्रवरा एव्हिएशन इन्स्टिट्यूट, ओझर) आणि वैष्णवी मुर्तडक (अमृतवाहिनी पॉलिटेक्निक) हे विजेता ठरले तर वैष्णवी पगारे (गुरु गोविंद सिंग महाविद्यालय) हि उपविजेता ठरली. सर्वोत्तम सादरीकरणाचा मान सेजल मराठे आणो त्यांचा संघ (बी.वाय के महाविद्यालय) यांना मिळाला. स्पर्धेचे समन्वयन नेहा येवला, सारंग वाळिंबे आणि निशा नागदेव यांनी केले.
यावेळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना स्पर्धेच्या परीक्षकांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धचे समन्वयक म्हणून तेजस्वी जगताप, श्रीमती प्रिया सिंग, प्रज्ञा डोंगरदिवे आणि अनिरुद्ध बेलदार यांनी काम बघितले. स्पर्धा यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. हर्षा पाटील, बीबीए शाखा विभागप्रमुख लोकेश सुराणा, बीबीए-सीए शाखा विभागप्रमुख प्रतिमा जगळे, बीएस्सी-सीएस बीबीए-सीए शाखा विभागप्रमुख सोनाली इंगळे, बी.कॉम शाखा विभागप्रमुख डॉ. परमेश्वर बिरादर आणि महाविदयालयातील इतर शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी सहकार्य केले.
स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांचे मार्गदर्शन लाभले.
—