मोफत आरोग्य शिबिरात निसर्गोपचारविषयक मार्गदर्शन

नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

0

नाशिक : प्रतिनिधी

श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्गोपचार केंद्र, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शिव गोरक्ष योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर झाले. यात विविध आरोग्य तपासण्या, निसर्गोपचार चिकित्सा, तसेच निसर्गोपचारविषयक मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. पखाल रोडवरील प्लॉट नंबर ११, आनंद मंदिराच्या पुढे येथे हे शिबीर झाले.
प्रा. डाॅ. पी. डी. कुलकर्णी, अशोक पाटील, डाॅ. तस्मिना शेख, माजी महापौर सतीश कुलकर्णी, डॉ. रूपाली निकुळे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, डॉ. प्रतिभा औंधकर, स्वामी शिवानंद महाराज, कार्यकारी अध्यक्ष जय कोतवाल, डॉ. इजहार खान, डॉ. संतोष भाले, डाॅ. सुभाष काळे, शाहरुख पठाण, डॉ. ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते.

या शिबिरात निसर्गोपचारच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. ज्योती अंडरासकर, सानिया शेख, नाझिया अत्तार, साक्षी कदम, कृष्णा पवार, सीमा आवटे, भागवत आवटे, प्राची, अश्विनी थोरात यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

या शिबिरामध्ये निसर्गोपचाराच्या विविध पद्धतींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य जपण्यासाठी निसर्गोपचार किती प्रभावी ठरू शकतो, यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. या उपक्रमामुळे नागरिकांना नैसर्गिक उपचार पद्धतींचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे वारंवार आयोजन व्हावे, अशी मागणीही स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

शिबिराच्या आयोजनात माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. तस्मिना शेख यांनी विशेष मेहनत घेतली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.