नाशिक : प्रतिनिधी
पेठरोडवरील आरटीओ ऑफीसजवळील किशोर सूर्यवंशीरोडवर असलेल्या विद्या सेवा संस्थेच्या प्रणित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबीर झाले. यावेळी डॉ. संतोष वैद्य, डॉ. हनुमंत ठोके, डॉ. सुनील मोरे, डॉ. भरत हिरे, अक्षय मोरे, निखिल फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण दुसाने, डॉ. तोषा उभाळे, डॉ. शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.
विद्या सेवा संस्थेचे सचिव तथा प्रणित विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम झाला.
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता व प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्ण प्राशन देण्यात आले. तसेच सर्वांचे नाडी परीक्षण करण्यात आले. डॉ. शिवाजी जाधव यांनी देशी गायीच्या शेणाबद्दल माहिती दिली. डॉ. उभाळे यांनी नस्यबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या सेवा संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा पिंगळे, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रणित पिंगळे उपस्थित होते. डी. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
—
विद्या सेवा संस्थेच्या प्रणित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात
Get real time updates directly on you device, subscribe now.