नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये पितृदिन हा ह्रदयस्पर्शी आनंददायी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्यांकडून विविध उपक्रम राबविले गेले.
नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी टाय बनवले. ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी कार्ड बनवले. सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी ट्रॉफीकार्ड डिझाइन केले. मुख्य आकर्षण म्हणजे सिनिअर केजीचा एक खास कार्यक्रम होता. जेथे वडील त्यांच्या मुलासोबत कार्ड बनवणे, मजेदार खेळ खेळण्यात सामील झाले. धावा आणि उचला हा खेळ ते आनंदी सेल्फी काॅर्नरपर्यंतच्या उपक्रमात रमले होते. वडिलांनी त्यांच्या मुलांचे मनापासून कौतुक केले, तेव्हा मुले अभिमानाने फुलली होती. या कार्यक्रमाने वडील – मुलामध्ये बंधाचे मूल्य रूजवण्याचा व जोपासण्याचा प्रयत्न होता.
—