नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवसांच्या गणेशोत्सवाचे आयोजन उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आले. २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवात पहायला मिळाला.
मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यी व शिक्षकांचे कौतुक करत असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व सामाजिक जबाबदारीची भावना जागवतात, असे मत व्यक्त केले. या पाच दिवसात रोज सकाळी आणि सायंकाळी आरती केली जात होती. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सजावट केली होती आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून पारंपरिक पदार्थ सादर केले गेले.
—