नाशिक : प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र निकम, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष पंढरीनाथ बिरारी, सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी शैलेश पाटोळे, सहकार्यवाह उमेश कुलकर्णी, मुख्याध्यापक भास्कर कर्डिले, पालक संघाचे पदाधिकारी कर्डिले, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक विजय मापारी उपस्थित होते.
मुख्याध्यापक कर्डिले यांनी प्रास्ताविक केले. स्वागतगीत पंकज वेल्हाणकर यांनी तर, पाहुण्यांचा परिचय प्रशांत साबळे यांनी करून दिला. शैलेश पाटोळे, राजेंद्र निकम यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी अनिकेत लहाडे, मनीष डोंगरे, नेहा शिंदे, ज्ञानेश्वरी धुमाळ, सुरभी मडके यांनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ्य शिक्षिका गीतगौरी सराफ यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ्य शिक्षक माणिक गोमाशे यांनी आभार मानले.
—
पेठे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ उत्साहात
Get real time updates directly on you device, subscribe now.