अशोकामध्ये “बिल्डिंग ए  रेसिलियंट माईंडसेट फॉर एव्हरीवन  ” यावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन

0
नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या उच्च शिक्षण विभागातील गुणवत्ता विभागातर्फे एकदिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च, अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि अशोका बिझनेस स्कूलमधील शिक्षकांसाठी करण्यात आले होते.
डॉ. प्रीती सोनार, आयक्युएसी समन्वयक, अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज ॲण्ड रिसर्च यांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी स्वत: ची कार्यक्षमता, आत्मविश्वास, भावनिक नियंत्रण, स्वतःमधील बदल, दृढनिश्चय, जीवन जगण्याची कला, सकारात्मक दृष्टीकोन, शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी ध्यान आणि खेळाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सत्रामध्ये विविध मनोरंजक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांना त्यांनी दैनदिन उदाहरणसह उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय श्रुष्टी जैन यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयन आणि आभार प्रदर्शन गुणवत्ता विभाग प्रमुख डॉ. परमेश्वर बिरादार यांनी केले.
कार्यक्रमासाठी अशोका एज्युकेशन फाऊंडेशनच्या ए.सी.बी.सी.एस.महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. हर्षा पाटील, ए.आय.सी.इ.एस.आर. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सरिता वर्मा, ए.सी.इ. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके, अशोका बिसनेस स्कूलचे संचालक डॉ. सुनील डोके आणि इतर शिक्षकवृंद यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला आणि प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांचे मार्गदर्शन लाभले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.