नाशिक : प्रतिनिधी
येथील क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्षानिमित्ताने प्रशिक्षणार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा झाली. यात प्रशिक्षणार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.
या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआयच्यावतीने प्रमाणपत्राचे वाटप आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच महात्मानगर येथील मैदानावर वंदे मातरम गीताच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी आयटीआयमधील सर्व प्रशिक्षणार्थी, गट निदेशक, निदेशक, कर्मचारी व प्राचार्य नितीन काळे आदी उपस्थित होते.
—