नाशिक, (वा.)
पंचवटी मेडिकल असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय डॉक्टर्ससाठीची क्रिकेट स्पर्धा म्हणजेच `पीएमए चषक 2022ʼ चे उद् घाटन गोल्फ क्लब मैदानावर झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त विजय खरात, सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात, विभागीय अधिकारी कैलास राबडिया आदी उपस्थित होते. दोन दिवसीय या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 12 संघांनी भाग घेतला होता. कोविडच्या प्रदीर्घ काळानंतर कुठेतरी विश्रांतीसाठी सर्व डॉक्टर्स गोल्फ क्लब ग्राउंडवर बघायला मिळाले होते.
बक्षिस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून
नाशिक महापालिकेचे सहाय्यक आयुक्त मयूर पाटील, बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट मिस गौरी आणि उमेश वसवे उपस्थित होते. जिल्ह्यातील डॉक्टर्सच्या विविध संघटनांचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला.
या जिल्हास्तरीय डॉक्टर्स क्रिकेट स्पर्धेत पीएमए संघ हा विजेता ठरला. सातपुर-अंबड डॉक्टर्स असोसिएशन संघ (साडा संघ ) उपविजेता ठरला.
पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देवरे यांनी स्वागत आणि अभिनंदन केले.
—