नाशिक : प्रतिनिधी
पंचवटी मेडिकल असोसिएशनच्यावतीने डॉक्टर्स दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील वैद्यकीय बांधवांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देवरे होते. माजी अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे, केअर हॉस्पिटलचे डॉ. भरत पाटील, डॉ. अनिरुद्ध ढोकरे, किशोर बेलसरे आदी उपस्थित होते.
डॉ. सचिन देवरे म्हणाले की, पंचवटी मेडिकल असोसिएशन म्हणजे एक कुटुंब बनले आहे.
असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य डॉ. गणेश शिंदे, डॉ. रविकिरण निकम, डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. सतीश आहेर, डॉ. सुनील राऊत, डॉ. किशोर थोरात, डॉ. कवीश्वर, डॉ. मालती चौधरी, डॉ. नीलम जैन यांचा दीर्घकाळ वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल, तसेच समाजकार्य करणारे म्हसरूळचे प्रकाश उखाडे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मनोरंजनपर कार्यक्रम झाला. या सांकृतिक कार्यक्रमात प्रामुख्याने डॉ. किरण भांडगे, डॉ. दीपक क्षत्रिय, डॉ. गीताली भट, डॉ. शितल गडाख, डॉ. संजय रोकडे, डॉ. नितेश डांगे, डॉ.जैन, कुमारी ईश्वरी प्रसाद वाघ आदी सभासदांनी सुरेख संगीत-गायन केले. त्याबद्दल सर्वांना पारितोषिक देण्यात आले .
विशाखा मोकळ आणि सुनीता भगूरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सचिन देवरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. निलेश कुंभारे, खजिनदार डॉ. योगेश पगार, सेक्रेटरी डॉ. वैभव जोशी, महिला प्रमुख डॉ. रोशनी बोरा यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य लाभले.
—