नाशिक : प्रतिनिधी
दिव्यांग विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, मेहनतीचा अवलंब करून यशाची शिखरे पादक्रांत करावे. तसेच स्वावलंबनासह व्यावहारिक ज्ञान प्राप्त करावे, असे प्रतिपादन इरिन नाशिकचे मुख्य प्रशिक्षक प्रफुल्ल सोले यांनी केले.
ज्ञानसाधना बहूउद्देशीय विकास संस्थेच्यावतीने आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड होते. स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या सरचिटणीस ॲड. शोभा गोसावी, स्वानंदी शिक्षण संस्थेच्या (हरसूल) सचिव छाया कुलकर्णी, संस्थेचे सल्लागार अजित कुलकर्णी, सेवानिवृत्त शिक्षिका कल्पना भामरे, संस्थेचे सचिव प्रदीप जगताप, खजिनदार संगीता जाधव, समाधान मोरे, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे सचिव जगदीप कवाळ तसेच संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक, प्रतिष्ठित नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना पांढरी काठी, व शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अंध विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले. राजाराम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. यशराज शिंदे व यश औटे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या सामाजिक दातृत्वाची प्रशंशा केली. मान्यवरांची भाषणे झालीत. प्रा. वसुधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय परदेशी, संदीप पवार, ओमकार डावरे, अर्चना बोकेफोडे, यश औटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
इयत्ता 10 वी – प्रथम क्रमांक – यशराज शिंदे (९२.२०), द्वितीय – सोहम गांगुर्डे (७८.४०), तृतीय – वृषाली करपट (७७.२०). १२ वीचे विद्यार्थी असे : प्रथम – यश औटे (८३.५०), द्वितीय – शांतनु पवार (७४.६७), तृतीय – नंदिनी गवांदे (६७.१७). सविता भोये, जया गांगुर्डे, ढेंगळे शार्दुल, सुनिधी चव्हाण, तेजस नरोडे, मोनिका बोरसे, हेमाली सहाणे आदी विध्यार्थी सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते.
—