नाशिक : प्रतिनिधी
दिंडोरी तालुका युवाप्रमुख सागर धात्रक
यांचा वाढदिवस हा मानोरी (ता. दिंडोरी) येथील हनुमान मंदिरात जगद्गुरू माऊलींचे निर्गुण रूपात माऊलीं समक्ष ऑनलाइन आरतीच्या ठिकाणी अतिशय जल्लोषात साजरा केला. याप्रसंगी धात्रक यांनी सपत्निक केक कापला.
यावेळी मानोरी गावातील विठ्ठल शेळके, शिवनाथ सूर्यवंशी, वसंत भाबड, बबन भाबड, अशोक भाबड, अर्जुन पवार, संतोष बुनगे, सागर बुणगे यांनी शाल व बुके देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तुंगलदरा आरती केंद्रातील महिला अध्यक्ष अनिता बेंडकुळे, सुदाम कराटे, योगेश बेंडकुळे, सौरभ बेंडकुळे, करण बेंडकुळे, यांनीही सागर धात्रक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मानोरी गावातील आरतीला उपस्थित असलेल्या भाविक,भक्तांनी भरभरून शुभेच्छा देऊन अतिशय नयनरम्य वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
—