नाशिक : प्रतिनिधी
धम्मगिरी योग महाविद्यालय व कुणाल प्राथमिक शाळा, (राजीवनगर) यांच्या संयुक्त विद्यमानाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत घर घर तिरंगा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ज्येष्ठ्य योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर, धम्मगिरी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या सचिव डॉ. पल्लवी जाधव, धम्मगिरी योग महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जगदीश मोहुर्ले, पाटील, ॲड. शरद जाधव, कालिंदाताई उपस्थित होते. प्रा. सिन्नरकर व प्रा. मोहुर्ले यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला.
कुणाल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय अहिरे, उर्मिला भदाणे, राजपूत, जाधव, नागरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्राचे संचालक गोविंदराव कटारे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना तिरंगा झेंड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
घर घर तिरंगा हा एक राष्ट्रीय उपक्रम असून याचा उद्देश, विद्यार्थी आणि देशातील समस्त नागरिकांच्या मनात राष्ट्रीयत्व आणि स्वातंत्र्याची उदात्त भावना निर्माण करणे, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या घरादाराची राखरांगोळी केली आणि ऋषीमुनींच्या प्रिय भारतमातेला पारतंत्र्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे बलिदान केले…त्यांचे पुण्यस्मरण करणे, आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्ष पूर्ण झालीत या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणे हा आहे.
दुर्लभं भारते जन्म…या भारतमातेच्या कुशीत आम्ही जन्मलो हे आमचे भाग्य आहे….तिचे ऋण फेडण्यासाठी अवघ्या जीवनाचा यज्ञ करु, संपूर्ण समाजाला सुंदर करु…अशी प्रतिज्ञा सर्वांनी पवित्र राष्ट्रध्वजाच्या साक्षीने केली.
—
