नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीने अलिकडेच वरिष्ठ बालवाडी विद्यार्थी आणि त्यांच्या मातांसाठी दंत स्वच्छताविषयक कार्यशाळा झाली. मुलांमध्ये वाढत्या दंत समस्यांमुळे हा उपक्रम राबविण्यात आला. दंत शल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा नेमाडे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी दिवसातून दोनदा दात घासण्याचे आणि जेवणानंतर तोंड स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांना ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करण्यासाठी जंतू आणि दात किडण्याबद्दल आकर्षक कार्टून दाखवण्यात आले.
पालक कार्यशाळेत, डॉ. नेमाडे यांनी मुलांमध्ये दंत समस्या दर्शविणाऱ्या लक्षणांवर चर्चा केली आणि निरोगी दंत दिनचर्या सांगितली. पालकांना, त्यांच्या मुलांमध्ये चांगल्या तोंड स्वच्छतेच्या सवयी रुजवण्यास मदत करण्यासाठी सूचना केल्या. कार्यशाळेचा समारोप प्रश्नोत्तर सत्राने झाला.
—