वाचन संस्कृती जोपासणे आणि वृद्धिंगत करणे ही काळाची गरज : डॉ. योगेश जोशी

0

नाशिक  : प्रतिनिधी
वाचन संस्कृती जोपासणे आणि वृद्धिंगत करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. योगेश जोशी यांनी केले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अखंड वाचन यज्ञ उपक्रमातंर्गत आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात डॉ. जोशी बोलत होते. विठ्ठल कामत, मकरंद अनासपुरे, संकर्शन कऱ्हाडे यांनी विविध पुस्तके विकत घेऊन, वाचन चळवळ रुजवली आहे. अखंड ५० तास वाचन उपक्रमामध्ये पंधराशे वाचकांनी भाग घेतलेल्या उपक्रमामुळे वाचन उपक्रमाची गरज कशी आहे, हे त्यांनी प्रतिपादन केले.
सुनीता गायधनी आणि संजय जोशी यांची मुख्य व्याख्याने  झाली. सुरुवातीला दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाल्यावर संयोजक, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलचे संयोजक प्रा. अविनाश बल्लाळ यांनी प्रास्ताविक केले. जुई पाटील हिने स्वागतगीत सादर केले.
त्यानंतर सुनीता गायधनी, ॲड. शाम बडोदे, संजय जोशी, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अजिंक्य साने, देवानंद बिरारी, पदाधिकारी प्रकाश चकोर, माणिकराव शिंदे,  पंचवटी मंडल अध्यक्ष कुलकर्णी उपस्थित होते.
प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी वाचन दिनावर मनोगत व्यक्त केले. लेखक सुहास टिपरे, सुबोध धर्माधिकारी, गोविंद केंगे, रानमाळे, श्रद्धा भुरे, राज महेश हिरे, उपासनी, मानस जोशी आदी अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. सुस्वर क्रियेशनच्या सुकन्या जोशी व सहसंयोजक सुहास टिपरे यांनी सूत्रसंचालन केले. शार्दुल बल्लाळ यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास आशा बल्लाळ, नीता व विवेक बोबडे, सुधाकर गायधनी, रमेश मोडक, प्रसाद दहीवेलकर, सिद्धेश सोमवंशी, आनंद गोरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल संयोजक बल्लाळ व सहसंयोजक सुहास टिपरे, शार्दुल बल्लाळ व दिलीप बल्लाळ यांनी सांस्कृतिक सेल भाजप नाशिकच्यावतीने सर्वांचे आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.