नाशिक : प्रतिनिधी
ओमीकॉन व्हेरीएन्टचा धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्या संदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढीलप्रमाणे माहिती दिली.
ओमीक्रॉन व्हेरिएटचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात आणि त्यासाठी काय तयारी केली पाहिजे यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.
– यापूर्वीच्या व्हायरसला पसरण्यासाठी 10-15 मिनिटे लागायची; ओमीक्रॉन व्हायरस 4-5 मिनिटात पसरतो व त्याचे परिणाम अधिक घातक असल्याचे असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
– सर्व विमानतळांवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे.
– नाशिकच्या ओझर विमानतळावरही प्रवाशाची प्रवास हिस्टरी तपासून कॉन्टेक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे.
– मास्क, सामाजिक अंतर हे पाळावे लागणार असून गर्दीत जाणे टाळावे लागणार आहे.
– आरोग्य सुविधांचा फैर आढावा घेऊन नियोजनाचा पुनर्विचार करणार.
– या व्हेरिएटसाठी मास्क हीच ढाल असल्याने डबल मास्क किंवा चांगल्या दर्जाचे मास्क घालावे.
– विशेष मोहीम राबवून लसीकरण करण्यात येणार आहे. जेणेकरून एखाद्याला बाधा झालीच तर त्याचे परिणाम खूप नाही होणार, त्यामुळे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये.
—