नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोड येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या आयटीआयमध्ये सोमवारी (दि. 15) अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहामध्ये झाला.
समारंभात सुरुवातीला सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या प्रतिमेला अंबड एमआयडीसीमधील उद्योजक रोशन चेवले यांनी पुष्पहार अर्पण केला. आयटीआयचे प्राचार्य काळे यांनी प्रास्ताविकात उत्तीर्ण झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची कौतुक केले. यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात काम करता येईल याबद्दल विस्तृत माहिती दिली.

मुख्य अतिथी रोशन चेवले यांनी उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांशी बोलताना व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे, असे सांगून आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना केवळ देशातच नव्हे, तर परदेशात सुद्धा नोकरीच्या भरपूर संधी आहेत. या संधीचा प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने फायदा घेतला पाहिजे असे सांगितले.
यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणपत्रक वाटप करण्यात आले. निदेशक संदीप काजळे यांनी सूत्रसंचालन केले. निदेशिका सोनाली खिलारी यांनी आभार मानले. मंचावर गटनिदेशक साहेबराव हेंबाडे, उमेश पालवे, निदेशक दीपक साळवे, आनंद जाधव, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, अमोल नागरे, गोकुळ बेदाडे, योगेश गांगोडे, अजय पवार, तसेच राहुल सानप व इतर कर्मचारी उपस्थित होते.
—