नाशिक : प्रतिनिधी
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान गौरव दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमात सर्वप्रथम संविधान प्रस्तावना सामूहिकरित्या वाचण्यात आली. यानंतर संविधान शपथ वाचन करण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल आणि लोकशाही मूल्यांबद्दल माहिती देणारे मार्गदर्शन प्राचार्य नितीन काळे यांनी केले. त्यांनी संविधानाचे महत्त्व सांगताना प्रशिक्षणार्थ्यांना मूलभूत कर्तव्यांची पालन करण्याचे आवाहन केले. तसेच संविधानाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय संविधान हे जगातील सगळ्यात मोठे लिखित संविधान आहे. संविधान भारताचा सर्वोच्च कायदा जो सरकारची रचना, नागरिकांचे अधिकार व कर्तव्य ठरवतो. संविधान करण्यासाठी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले व 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण होऊन ते एक वर्षानंतर म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आले, असे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयटीआयचे निदेशक आनंद जाधव यांनी केले. प्रास्ताविक आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांनी केले व आभार प्रदर्शन गटनिदेशक साहेबराव हेंबाडे यांनी केले.
या कार्यक्रमाला निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, महेश बोडके, गोकुळ बेदाडे, अजय पवार, योगेश गांगोडे, प्रतीक्षा बदादे, सोनाली खिराडी, मोहन पवार, सर्व कर्मचारी व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
—