नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्या कार्यालयामध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रम झाला. स्वराज्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे व महिला प्रमुख रेखा नेहरे यांनी याचे आयोजन केले होते.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व भारतीय संविधानाचे पूजन प्रमुख पाहुणे नितीन पगारे, प्रवीण पगारे, विनायक सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी, विजय मोराडे, शांताराम नेहरे, हिरामण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशपत्रिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे म्हणाले की, स्वराज्य परिवाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून संविधानाची उद्देशपत्रिका सरकारी कार्यालय, विद्यालय, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, अभिनेते यांना देत आहे. रेखा नेहरे यांनी आभार मानले.
—
—