अस्थमा आजार :
‘ दमा ’ हा आजार एकदा रुग्णाला जडला की रुग्णाचा चांगला दम काढतो. असा हा दमा ज्याला दम लागणे. धाप लागणे श्वास घेण्यास मोठा अडथळा निर्माण होणे. वर्षानुवर्ष औषध उपचार घेऊनही. न दमणारा आजार म्हणजे दमा या आजारास मनोकायिक विकारही मानले जाते.
कारण :
दम्याचे मूळ कारण ही पोटाची खराबी. पचन व्यवस्थित न होणे, पोट साफ न होणे, गॅसेस, करपट ढेकर, मळमळ यामुळे पक्वाशयात दूषित रस उत्पन्न होतात व श्वसन प्रणालीत बाधा उत्पन्न होते. श्वसन उखडण्याची स्थिती उत्पन्न होते. काही वेळेस निरंतर ताप तसेच खोकला, कफ पडणे, निमोनिया पूर्ण बरा न होणे तसेच आई वडिलांस दमा असेल तर अनुवांशिकता असणे. विडी उद्योगात काम करणारे कामगार, खाण कामगार, केमिकल कंपन्यांमध्ये काम करणारे, सिमेंट उद्योग, स्टोन क्रेशर किंवा जास्त धुळीचा संपर्क ज्यांना आहे अशा बहुतेक व्यक्तीमध्ये. काळजी न घेतल्याने दमा दिसून येतो.
लक्षणे:
१) श्वास घेण्यास कष्ट होणे.
२) छाती जड पडणे.
३) पोट फुगणे.
४) संपूर्ण शरीरात बेचैनी व भीती उत्पन्न होणे.
५) थंडी, ताप येणे.
६) कफ उत्पन्न होणे.
७) स्नायू दुर्बलता वाटणे.
८) कोरडा खोकला येणे किंवा जीवघेणा खोकला येणे.
९) मूत्राचा रंग लाल होणे.
१०) तहान खूप लागणे.
११) फुफ्फुसांची क्षमता कमी होणे.
योगोपचार : आसन- ताड़ासन, कटिचक्रासन, तानासन, सर्वांगासन, भुजंगासन, धनुरासन, वज्रासन, उष्ट्रासन, गोमुखासन, अर्ध मत्स्येंद्रासन, मत्स्यासन शवासन, पवनमुक्तासन, सिंहासन. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते.
प्राणायाम- नाडीशोधन, सूर्यभेदन भस्रिका.
बंध- उडीयान, जालंधर ,योगनिद्रा, ध्यान.
निसर्गोपचार:
आहार- रसाहार फलाहार हिरव्या पालेभाज्या, झाड, पिठाची रोटी. ताजा आहार, सूर्य तप्त जल पिण्यासाठी वापरावे.
जलचिकित्सा- कटिस्नान. गरम पादस्नान. छाती लपेट. पोट साफ होण्यासाठी इनिमा, पोटाची मॉलिश, शतपावली.
वर्ज : द्विदल, तेलकट, खूप तिखट, दही, आंबवलेले पदार्थ, आइस्क्रीम कोल्ड्रिंक्स, शिळे अन्न, दूध, केळी, मैद्याचे पदार्थ घेऊ नये. अति आहार घेऊ नये. जेवणानंतर लगेचच झोपू नये. मीठ, साखर घेऊ नये. जास्त धुरात व घाणेरड्या वासांपासून दूर रहावे.
– प्रा.डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल:rajendrawaman@
मोबाईल नंबर:९८२२४५०७६