नाशिक : प्रतिनिधी
येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चिन्मय मिशनचा 128 क्रमांकाचा बूक स्टाॅल साहित्य रसिकांच्या गर्दीचे केंद्र बनले आहे. या स्टाॅलवरील अध्यात्मिक पुस्तके सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मिशनच्या नाशिक केंद्राच्यावतीने या स्टाॅलवरून पुस्तक विक्री होत आहे. स्वामी अद्वैतानंद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक केंद्राचे कामकाज होत आहे.
या स्टाॅलवर उपनिषदे, गीता अध्याय, भज गोविंदम, आत्मबोध, विविध स्तोत्रे, पंचदशी, विवेक चुडामणी, सुखी जीवनाचे रहस्य, तसेच ध्यानविषयक पुस्तके उपलब्ध आहे. ही पुस्तके मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत आहेत. शिवाय त्यांच्या खरेदीवर भरघोस सूटही दिली जात आहे.
या बूक स्टाॅलचे काम जीवराम गावले, जीवत इदनानी, ज्योती वैद्य, विदुला घाटपांडे हे पाहत आहेत.
—