नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये चिमुरड्यांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने आणि उर्जेने साजरा करण्यात आला. दिवसाची सुरुवात योगासनांनी केली पाहिजे हे सांगून योगासने आपल्या आरोग्यासाठी, आनंदासाठी कशी उपयोगी आहेत हे समजावण्यात आले.
प्रशिक्षित शिक्षकांसोबत विद्यार्थी योगासनासाठी तयार झाले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षासन, ताडासन, अशी विविध सोपी योगासने केली. या मजेदार आणि सोप्या व्यायामांनी त्यांचे संतुलन, एकाग्रता आणि लवचिकता सुधारण्यास मदत केली. योगासनांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद झळकत होता. व्यायाम आणि पौष्टिक अन्नाच्या संतुलनाने चांगले आरोग्य लाभते. सिनिअर केजीने निरोगी भाज्यांचे सूप बनवले. ज्युनिअर केजीने फळांचे सॅलड बनवले आणि नर्सरीने भाज्यांचे सॅलड बनवले. काही मिनिटांच्या विश्रांती आणि खोल श्वासोच्छवासने सत्र संपले. विद्यार्थ्यी ओंकारचा एक छोटासा जप
देखील शिकले. ज्यामुळे त्यांना शांत आणि एकाग्र होण्यास मदत झाली. या योगाद्वारे, विद्यार्थ्यांनी शिकायला मिळाले की योग फक्त व्यायामाबद्दल नाही, तर आनंदी, शांत राहण्याबद्दलदेखील आहे. एकंदरीत, योगदिन हा आनंदाने भरलेला एक आनंददायी आणि उत्साहाचा दिवस होता.
—