चिमुरड्यांचा उत्साह आणि देशभक्तीचा जागर; युडब्ल्यूसीईसी प्री – स्कूलमध्ये ‘प्रजासत्ताक दिन’ संपन्न

0

नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसी पूर्व प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साह आणि सर्जनशीलतेने साजरा करण्यात आला. लहान वयातच मुलांमध्ये देशभक्ती, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मुले विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशात शाळेत आली होती.

नर्सरी वर्गातील मुलांनी त्रिरंगी टोप्या तयार केल्या आणि राष्ट्रीय ध्वजाचे चित्र रंगवले. ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी त्रिरंगी बॅज आणि ध्वज बनवले, तर सीनिअर केजी वर्गासाठी आकर्षक फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना पॉवर पॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून भारताचे संविधान, देशातील विविधता, राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीत याबाबत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. गायनवृंदाने मेरा जूता है जापानी हे देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचा एक विशेष आकर्षण म्हणजे मुलांसाठी ठेवण्यात आलेला त्रिरंगी विशेष टिफिन, ज्याचा सर्वांनी आनंद घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.