नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. लहान मुलांनी कृष्ण व राधेचे वेश परिधान केले होते. मोरपीस व दागिने घालून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. विविध उपक्रमांतून साजऱ्या झालेल्या या उत्सवात मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. यानिमित्त विद्यार्थ्यांना भगवान श्रीकृष्णाचे आदर्श, त्यांची मूल्ये आणि जीवनाची शिकवण मिळाली.
सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी कार्यपत्रके रंगविली. ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर हेडबॅण्डस तयार केले. नर्सरीच्या लहानग्यांनी मटका पेंटिंग करून आपली कला दाखवली. शाळेत काला (प्रसाद) बनवण्यात आला. दहीहंडीचा खेळही रंगला. उंचावर लटकलेल्या हंडीला फोडण्याचा प्रयत्न करताना मुलांनी आनंदाने हशा पिकवला. संपूर्ण कार्यक्रमात सर्वांनी टाळ्या वाजवून, गाणी गाऊन व नाचून भरपूर आनंद लुटला.
—