बालचित्रकार मयुरेश राजा रविवर्मा पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाकडून देण्यात आला पुरस्कार

0

नाशिक  : प्रतिनिधी

बालचित्रकार मयुरेश राजेंद्र आढाव याला राजा रविवर्मा बालचित्रकार पुरस्कार 2023 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ,नाशिक जिल्हा आणि व्हीजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघ  यांच्यावतीने चित्रकार राजा रविवर्मा जयंतीनिमित्त राष्ट्रीय कला दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जीवनगौरव पुरस्कार, शिक्षकगौरव पुरस्कार व राजा रविवर्मा बालचित्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, प्रसिद्ध चित्रकार राजेश सावंत, प्रा. दिनकर जानमाळी, चित्रकार भिमराज सावंत, तानाजी जयभावे, साहेबराव कुटे, दिपक वर्मा, सागर कर्पे, महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

सन्मानपत्र प्रदान
मयुरेश त्याच्या कलेच्या माध्यमातुन जनमानसात सृजनाचा आनंद निर्मिती करणारा कलावंत असून, आपल्या जादुई कुंचल्याच्या माध्यमातुन कलेचा समृद्ध अनुभव देणारा, आपल्या कलेतून  कला क्षेत्रात आपला ठसा उमटविणारा कलावंत आहे. कमी वयात मयुरेशने  केलेली प्रगती ही नेत्रदीपक व अभिमानास्पद आहे’ अशा आशायाचे सन्मानपत्र ‘राजा रविवर्मा पुरस्कार’ मयुरेशला देण्यात आला.

सोलो प्रदर्शन भरवणारा एकमेव
मयुरेशने आजवर अनेक विभागीय, जिल्हास्तरीय तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमधून यश मिळविले आहे. त्याने चारकोल, वॉटर कलर, सौफ्ट पेस्टल, पेन्सिल, कलर पेन्सिल अश्या अनेक माध्यमात चित्रे काढली असून कमी वयात नाशिकमध्ये स्वतःचे सोलो प्रदर्शन भरवणारा तो एकमेव बालचित्रकार आहे.

यांनी केले कौतुक
मयुरेशचे आई-वडील, महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघ आणि व्हीजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघाचे पदाधिकारी कलाशिक्षक दत्तात्रय सांगळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोखंडे, जिल्हासचिव चंद्रशेखर सावंत, सचिन पगार, रमेश तुंगार, मिलिंद टिळे, महेंद्र झोले, अशोक घुगे, रेखा धात्रक, धनश्री भिसे यांनी मयुरेशचे यावेळी कौतुक केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.