नवज्योती महिला मंडळ आयोजित कुकरी शो साठी शेफ संदीप सोनार यांनी मिळवली वाहवा

0

नाशिक  : प्रतिनिधी
नवज्योती महिला मंडळाने आयोजित केलेल्या स्वाद मंत्रा- कुकरी शो साठी शेफ संदीप सोनार यांनी पनीर ममताई आणि जैन ग्रीन टिक्की हि स्वादिष्ट व्यंजन बनवून उपस्थित महिलांची वाहवा मिळविली. महिलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. शेफ संदीप सोनार यांनी देखील त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंका समाधान केले.
शेफ संदीप सोनार हे एस आर केटरर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट चे संचालक आहे. संदीप सोनार हे प्रोफेशनल शेफ असून ते स्पोर्टस न्यूट्रिशनिस्ट देखील आहे. तसेच ते सर्टिफाइड फिटनेस ट्रेनर देखील आहे. विविध कुकरी शो च्या  माध्यमातून आपली हेल्थ किती महत्वाची आहे आणि आपल्या रोजच्या आहारात कोणत्या प्रकारच्या फूड असायला हवे, त्याचे महत्व काय आणि आपल्या हेल्दी लाईफ स्टाईल वर आपण कोणते फूड खातो त्याचा काय परिणाम होतो याबद्दल समाजात जागरूकता निर्माण होण्यासाठी शेफ संदीप सोनार यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे.

शेफ संदीप सोनार हे एस आर केटरर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट च्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून फक्त नाशिकच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध काना कोपऱ्यात रुचकर आणि स्वादिष्ट फूड आणि केटरिंग साठी प्रसिद्ध आहे.
या प्रसंगी नवज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा भावना कासलीवाल, उपाध्यक्ष स्वप्ना बिर्ला, दीपाली देशमुख, पीआरओ आरती विंचूरकर व सर्व महिला उपस्थित होत्या.
शेफ संदीप सोनार यांचा लाईव्ह कुकुरी शो सुरु होण्यापूर्वी नवज्योती महिला मंडळाच्या सदस्यांनी वेगवेळे पदार्थ बनवून आणले होते. ते सर्व पदार्थ शेफ संदीप सोनार यांनी टेस्ट घेऊन त्यानुसार स्वाद मंत्रा च्या प्रथम विनर ठरल्या स्नेहल मोरे, द्वितीय ज्योती खोले तर तृतीय क्रमांक जया बुरड यांचा लागला. उत्तेजनार्थ बक्षीस  सुजाता कुलकर्णी व पूजा ठोले यांना देण्यात आले. या कार्यक्रमासाठी अडावदकर ज्वेलर्स, व्हिजन हॉस्पिटलच्या श्रुष्टि व्हिजन यांनी सहकार्य लाभले. अडावदकर ज्वेलर्स व श्रुष्टि व्हिजन यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

शेवटी संदीप सोनार यांनी असे कार्यक्रम राबवल्यास हेल्थी फूड घराघरातून तयार केले जातील व त्याचा पुढील पिढीला चांगला फायदा होईल असे प्रतिपादन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.