नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील आडगावनाका येथील श्रीराम मित्रमंडळ शाळेत योग दिनानिमित्त अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ व श्रीराम मित्रमंडळ प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.
योगशिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे, योगाचार्य अशोक पाटील, योगशिक्षिका अर्चना दिघे, योगशिक्षिका अनुष्का खळदकर, निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. अंजली भालेराव, डॉ. विनोदकुमार भट यांनी योग प्रात्यक्षिके, प्राणायाम, व्यायाम घेत योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा सोनजे, शिक्षक सुनील सोनार, शिला साळुंके, आशा क्षीरसागर, चंद्रकांत डोंगरे, अविनाश वाघ, गंगाधर बहिरम, सुभाष जगदाळे, खंडेराव डावरे, मनोज राठोड, उषा सातपुते, मंगला चव्हाण, भगवान आहिरे, सीमा चव्हाण, सरला पाटील यांनी परिश्रम घेतले.
चंद्रकांत डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील सोनार यांनी आभार मानले.
—