नाशिक : प्रतिनिधी
दिवंगत सीडीएस बिपिन रावत व त्यांच्या पत्नी आणि इतर सहकाऱ्यांना रविवार कारंजा येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
ओमकार विरेंद्रसिंग टिळे यांनी रांगोळीमधून रावत यांची प्रतिमा हुबेहूब साकारली होती. सर्वांनी दिवे, मेणबत्ती लावून श्रध्दांजली वाहीली.
शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते, हिंदु एकता आंदोलनचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या महिला प्रदेशाध्यक्षा माधुरी गुजराथी (पुणे), माजी महानगरप्रमुख महेश बडवे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे, ज्योती देवरे, सीमा टिळे, गुड्डीताई रंगरेज, श्रध्दा दुसाने, भागवत, वाहतूक पोलीस कर्मचारी खैरे, अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे जिल्हाध्यक्ष भारतसिंह परदेशी, योगेश राजपूत, सुशीलसिंह, सवितासिंह, मिनाक्षी परदेशी, बबलूसिंह परदेशी, ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशन टिमचे अशोक वराडे, राजेंद्र आहिरे, मंगला पिसे, पूजा जाधव, कमिनी भानुवंशे, पंकज भानुवंशे, ज्योती देवरे, पोलिस मित्र परिवार समन्वय समितीचे विशाल पाटील, शैलेश पगार, राजेंद्र आहिरे, अब्बासभाई, विजया जाधव, मंगल मोकळ, रोहिणी जाधव, सिमी राणा, गितादीदी शामसुखा, चेतना सेवक, रेखा गिते, मंजुषा लोहगावकर, नाना काळे, आदित्य जाधव, मनोज कुलकर्णी, दीपक आढाव, संतोष वाडेकर, मोहन पैठणे आदी उपस्थिती होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विरेंद्रसिंग टिळे, सुनील परदेशी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी बोरस्ते, बावरी, गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले.
यामध्ये सहभागी संस्था
अखिल भारतीय क्षत्रिय महासभा,
शिवसेना, नाशिक ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम, पोलीस मित्र परिवार समन्वय समिती, दक्ष राष्ट्रभक्त फाऊंडेशन, हिंदु एकता आंदोलन.
—