नाशिक : प्रतिनिधी
गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे येथील श्रीमती पुष्पवतीबाई चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष रणजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शेकोटी साहित्य संमेलनात हा गौरव करण्यात आला. पाटील यांनी ट्रस्टच्या माध्यमातून अनेक निसर्गोपचारविषयक शिबिरे घेतली आहेत. यातून नागरिकांत आरोग्यविषयक जनजागृती झाली आहे. समाजोपयोगी कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी विझर्म्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ट्रस्टच्या निसर्ग विद्यानिकेतनच्या माध्यमातून विविध निसर्गोपचारविषयक अभ्यासक्रमांचेही आयोजन त्यांनी केले आहे.
दरम्यान, श्रीमती पुष्पवतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांचाही ट्रस्टच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टच्या अध्यक्ष डाॅ. तस्मीना शेख, सचिव सुनिता पाटील आदी उपस्थित होते.
—