नाशिक : प्रतिनिधी
बॉईज टाऊन या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मनिषा साहेबराव पवार यांना सेलिनस युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड लिटरेचर (लंडन) या विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पी. एचडी) ही पदवी दिली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय `उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या भावनिक, बुद्धिमत्ता, आनंद आणि शैक्षणिक यशाच्या प्रेरणेचा तुलनात्मक अभ्यास व त्यांचे शैक्षणिक यशावर होणारे परिणामʼ हा होता.

डॉ. सालवतोर फावा (लंडन), डॉ. रवींद्र कावडे (नगर), प्राचार्य राम कुलकर्णी (नाशिक) यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
—