नाशिक : प्रतिनिधी
संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळ या संस्थेच्या गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठाच्या कुलगुरुपदी येथील प्रसिद्ध श्रीविद्या साधक व संजीवनी शक्तीपाताचार्य भाऊनाथ महाराज यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक दोन वर्षांसाठी असून, ज्योतिष ज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी संजीवनी संस्था कार्य करते. फेब्रुवारी २०१२ पासून सातारा येथे संजीवनी ज्योतिष ज्ञानप्रसारक मंडळ कार्यरत असून, या संस्थेतर्गत ज्योतिषशास्त्राचा शास्त्रीय प्रसार व प्रचार करण्यासाठी ज्ञानपीठांतर्गत ज्योतिष अभ्यासक्रम घेण्यात येतो.
या ज्ञानपीठातून शिक्षण घेऊन आजपर्यंत शेकडो विद्यार्थी ज्योतिष शिक्षित होऊन उत्कृष्ट ज्योतिष मार्गदर्शन करत आहेत. दर दोन वर्षांसाठी गुरूकुल ज्योतिष ज्ञानपीठाच्या कुलगुरुपदासाठी महाराष्ट्रातील नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तीची नेमणूक होते. भाऊ महाराज हे आध्यात्मिक व अभ्यासू व्यक्ती असल्याने कुलगुरुपदासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र या प्रचंड व्याप्ती असलेल्या शास्त्राच्या अभ्यासासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करून या शाखाचे अभ्यासक, पंडित तयार करून त्यांच्यामार्फत सर्व समाजाला योग्य मार्गदर्शन उपलब्ध करवून देणे हा उद्देश आहे.
भाऊ महाराजांसारख्या ज्येष्ठ, श्रेष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या बहुमूल्य ज्ञानाचा संस्था, ज्ञानपीठ व विद्यार्थी वर्गाला तसेच ज्योतिष प्रसार व प्रचाराच्या कार्याला नक्कीच फायदा होणार आहे. ते विद्यापीठाचे चौथे कुलगुरू आहेत , अशी माहिती गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विकास खिलारे यांनी दिली.
—
गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठाच्या कुलगुरुपदी भाऊनाथ महाराज
Get real time updates directly on you device, subscribe now.