योग व निसर्गोपचार तज्ज्ञ भानुदास परबत यांना योगरत्न पुरस्कार प्रदान

0

नाशिक  : प्रतिनिधी
हंस योग साधना निसर्गोपचार संस्थेचे संस्थापक, तसेच
योग व निसर्गोपचार तज्ज्ञ भानुदास परबत यांना त्यांच्या योग क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नुकत्याच झालेल्या समारंभात हा गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) यांच्या डॉक्टर सेल-आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष  आणि उद्घाटक शिक्षण सम्राट  डॉ. बाळासाहेब पवार (प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल) यांच्या हस्ते भानुदास परबत यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मनोज दांडगे, तसेच डॉ. नितीन राजे – पाटील (व्हाइस चेअरमन – आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि प्रदेश कार्याध्यक्ष-आयुष विभाग), डॉ. सतीश कराळे (चेअरमन, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन), डॉ. बाबुराव कानडे (अध्यक्ष, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन) हे उपस्थित होते. त्याचबरोबर दिशा चव्हाण, कुणाल महाजन, प्रशांत सावंत, मनोहर कानडे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभरातील अनेक नामांकित योग प्रशिक्षक आणि योग थेरपीस्ट्सदेखील मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.